सोमेश्वर महादेव मंदिर
| सोमेश्वर महादेव मंदिर |
बारा
ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तरीदेखील नाशिक नगरीत आणखी एका स्वयंभू
महादेव मंदिराची भर पडली ती म्हणजे ‘सोमेश्वर महादेव मंदिर’. शहराच्या जवळच असलेले गाव गंगापुरजवळ स्थापित
असलेले हे मंदिर.
रामायणात
मिळणाऱ्या उल्लेखानुसार एकदा देवसभा सुरु होती, त्यात ब्रह्मदेवाच्या पाचव्या
मुखाने श्री विष्णुंसह महादेवांवर निंदा सुरु केली. महादेवाने क्रोधाने पाहूनही ब्रह्मदेवाकडून
निंदा सुरूच होती. अखेर क्रोध अनावर
झाल्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटून टाकले.
यामुळे सभेत अत्यंत शांतता पसरली.
देवांनी शिव शंकरांचा जयघोष सुरु केला.
ब्रह्महत्येच पातक घडल्यामुळे महादेव खिन्न झाले. तसेच भगवान शंकराच्या खड्गावर ब्रह्मदेवाचे ते
शीर तसेच जिवंत होण्यासाठी काय करावं असा विचार करून त्यांनी पृथ्वी तीर्थाटनासाठी
प्रारंभ केला. वाटेत त्यांना ऋषीमुनी
भेटले सांगितले की, ब्रह्महत्येच पातक दूर करण्यासाठी नाशिकच्या सोमेश्वर येथे
देवनारायण नावाचा ब्राह्मण सांगेल सांगितले की, पातक घालविण्याचा मार्ग नक्की
सापडेल, हे ऐकून शिवशंकर तात्काळ सोमेश्वराच्या ठिकाणी आले. त्यांच्याकडे असलेली गाय आणि वासरू (नंदी)
यांच्यात संवाद सुरु होता, वासरू म्हणाले, ‘माझ्या नाकात वेसन घातली; तर मी त्याला
ठार मारेन’, हे ऐकून गाय म्हणाली ‘अरे पण, त्याला मारून तुला ब्रह्महत्येच पातक
लागेल’, वासरू म्हणाले, ‘तू काळजी करू नको, ब्रह्महत्येच पातक दूर करण्याचा उपाय
मला माहित आहे’, हे ऐकून या वासरावर लक्ष ठेवावे लागेल, असा विचार करून महादेव
झोपी गले. शेतात काम करायचे असल्याने सकाळ
होताच ब्राह्मणाने गोठ्यात येवून वासराला वेसन घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वासराने ब्राह्मणावर हल्ला केला आणि
ब्राह्मणाला ठार केले. त्यानंतर वासराने
गोदावरी नदीच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली हे पाहून भगवान शंकरही त्याच्या मागे
गेले. वासराने रामकुंडाच्या ठिकाणी येवून
गोदावरी नदीत डुबकी मारली. त्यामुळे
वासराचे पाय धुतले गेले, वासराने नाकाची बोंडी, शेपटाची गोंडी वर ठेवली. त्यामुळे नाकाची बोंडी, शेपटाची गोंडी आणि
शिंगाचे टोक हा भाग तसाच राहिला.
महादेवांनी हे पाहून रामकुंडात उडी घेत आणि त्यांचेही पाय धुतले गेले अशा
प्रकारे हे वासरू भगवान शंकरांचेही गुरु ठरले.
त्यामुळे रामकुंडाच्या समोर कपालेश्वराची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी नंदीची स्थापना नाही. शंकराचे हे एकमेव असे मंदिर आहे की जेथे नंदी
नाही. गंगापूर गावाजवळ सोमेश्वर येथे
ब्राह्मणांच्या घराच्या ठिकाणी देवदेवतांची मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे. येथे शिवलिंगही आहे हे स्वयंभू असल्याने त्याची
मोठी ख्याती आहे.
नाशिकच्या उत्तरेत म्हणजे नाशिक गंगापूर
तलावानजीक सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे. गोदावशुद्री नदी किनारी असलेल्या या मंदिराला
पुराणकालीन संदर्भ आहेत. येथे स्वयंभू
सोमेश्वर प्रकट झाल्याची आख्यायिका आहे.
येथे सोमेश्वरचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वाहत असून ती जवळच
असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाल्याचे तसेच तिचा प्रवाह अव्याहत सुरु असल्याचे
सांगण्यात येते. मंदिराचा परिसर अतिशय
रमणीय आणि नयनमनोहर आहे. श्रावणात सोमवारी
तसेच महाशिवरात्रीला शिवभक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी असते. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला येथे
महाप्रसादाचे वाटप केले जाते.
श्री
सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट गंगापूर मार्फत सर्व नियोजन आणि नियंत्रण केले
जाते. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय,
शौचालयाची सोय येथे उपलब्ध आहे.
सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे. एकूण १३ खोल्या येथे उपलब्ध आहेत. भोजन व्यवस्था आहे. सामाजिक उपक्रमात सहभाग म्हणून विवाह
सोहळ्यासाठी मंदिर परिसर दिला जातो.
निसर्गरम्य परिसर असल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेष आकर्षण येथे लहानग्यांना आनंद
लुटण्यासाठी रेल्वे सफर व बोट सफर येथे आहे.
श्रद्धास्थान व आनंदमयी वातावरण असल्याने हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट गंगापूर :
अध्यक्ष : श्री. मुरलीधर देवराम पाटील
सचिव :
श्री. संतु रुंजाजी पाटील
पुजारी :
श्री. पंडित देवनारायण झा.



