कालिका मंदिर
![]() |
| कालिका माता मंदिर |
नाशिक
तपोभूमिमधील आणि नाशिक नगरीचं आराध्य दैवत कालिका माता होय. नाशिक नगरीतील भाविक शुभकार्याची सुरुवात या
ग्रामदैवत गडकरी चौकाजवळील कालिका मातेच्या शुभाशिर्वादाने करतात. या मंदिराचा जीर्णोद्धार १९७४ साली नगराध्यक्ष
वसंतराव गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
या मंदिराच्या वास्तूची रचना आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे यांच्या उत्कृष्ट
संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. मंदिराचा
गाभारा पूर्वी लाकडी स्वरुपात होता. त्याच
रुपात उच्च प्रतीच्या मार्बलमध्ये गाभाऱ्याची पुर्नबांधणी करण्यात आली. मंदिरासाठी उच्च प्रतीच्या मार्बलबरोबर उच्च
प्रतीची फरशी देखील बसविण्यात आलेली आहे.
कालिका मातेच्या मंदिराची भव्य–दिव्य स्वरूपात
वास्तू उभारण्यात आलेली आहे. भाविकांना
नेहमी भुरळ घालणारी अशी मंदिराची वस्तू उभारण्यात आली आहे. मंदिर परिसरात वृक्ष लागवड, परसबाग देखील तयार
केलेली आहे. भाविकांना शुद्ध पिण्याच्या
पाण्याच्या सोयीबरोबर शौचालयाची सोयही केलेली आहे. सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात
आलेले आहेत. भाविकांच्या निवासासाठी
नुकतीच भक्तनिवास इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे . भक्तनिवासाची रचना जास्तीत
जास्त ५० ते ६० भक्तांना या निवासाचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने बांधण्यात येणार
आहे.
कालिका
माता ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबर इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा
या देवीवर आहे. भक्तांना पावणारी देवी
म्हणून कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक श्रद्धेने येतात. अनेक भाविकांनी देवीला नवस केलेला असल्याने नवस फेडण्यासाठी
येथे येत असतात. मंदिरात तीन समया अखंड
प्रज्वलित असतात .कालिका मातेच्या भक्तीची प्रचिती अनेक भाविकांना आल्याचे
भाविकांनी पुजाऱ्यांना सांगितलेले आहे. या
मंदिराचे पहिले पुजारी देविदास बाबा होते. सध्या किशोर पुराणिक हे देवीची पूजा करतात. देवीची आरती पुजारी आणि अतिथी, भाविकांना देखील
या देवीची आरती करण्यास दिले जाते. आरतीची
वेळ सकाळी ७ वा. आणि संध्या. ७ वा. असते. मंदिराची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत
आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत असते.
पोर्णिमा, नवरात्र उत्सव यावेळेस मंदिर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू
असते. मंदिर परिसर निसर्गाने फुललेला
नेहमी दिसतो . अनेक भाविक या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या बागेत लहानग्यासह आनंद
लुटतात. प्रसादाबरोबर खेळणीही खरेदी करतात.
कालिका मातेचा आशीर्वाद या भक्तांबरोबर संपूर्ण
नाशिक नगरीवर नेहमी राहणारा सर्वांचे रक्षण करणारी देवी म्हणून कालिका माता ओळखली
जाते.
कालिका
मातेच्या मंदिराचे खास आकर्षण असते ते नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सवात मंदिराची खास आकर्षक सजावट
करण्यात येते. दहा दिवस येथे यात्रा चालू
असते भाविकांची मांदियाळी यावेळेस येथे असते.
भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. देवीला चांदीच्या मुकुटासह दागदागिनेचे
आभूषणांनी सजविण्यात येते.
श्री
कालिका माता मंदिर ट्रस्ट सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. देवीला येणारे धान्य सेवाभावी संस्था,
अनाथाश्रमाला देण्यात येते. श्री कालिका
मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावरून रिक्क्षा वा पायी जाता
येते. नाशिक रेल्वेस्थानकावरून शहर बस वा
रिक्क्षाने जाता येते.
श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट
अध्यक्ष : श्री. केशवराव (आण्णा) गुलाबराव पाटील
सचिव :
डॉ. श्री. प्रतापराव उत्तमराव कोठावळे
कोषाध्यक्ष : श्री. सुभाषभाई मगनभाई तळाजिया
Website :
www.kalikamatamandirtrust.org

No comments:
Post a Comment